Student Centric Activities
वर्ष २०१९-२०२०
- शैक्षणिक वर्षं २०१९-२०२० च्या अभ्यास मंडळाच्या उद्घाटन मा. प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. अरुण पाटील प्रा. शशिकांत पाटील व विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
- दररोज भूगोल विभागामार्फत स्वयंचलित हवामानदर्शक उपकरणाद्वारे संकलित माहितीचे आकाशवाणीवरून प्रसारण केले जात आहे.. शिवाय दैनंदिन माहिती हवामानदर्शक फलकावर लिहिली जाते.
- कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची कारणे व उपाययोजना याविषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी महानगर पालिकेचे आपटी व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- ०१ ऑक्टोबर 20१९ रोजी एकदिवसीय वर्षा सहल कास पठार (जि. सातारा) येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये बी.ए.भाग ३ व बी.ए. बी.एड भाग ४ मधील विद्यार्थी व विहागातील प्राध्यापक सहभागी झाले.
- आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या कोडोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे मा. सुरज बनसोडे यांची भूगोल विभागास सदिच्छा भेट.
- आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. वैभव गाडे या विद्यार्थ्याची पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल विभागामार्फत सत्कार करण्यात आला.
- शैक्षणिक वर्षं २०१९-२०२० साठी भोगोल विभागातील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील पूर परिस्थिती याविषयावर ग्रामसार्वेक्षण अतर्गत प्रकल्प तयार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शहरातील पूरबाधित ठिकाणांना भेटी देऊन माहिती संकलित केली.
- ब्रिगेडियर आर.व्ही. डोग्रा, इतर आर्मी ऑफिसर समवेत प्राचार्य व इतर प्राध्यापक यांनी भूगोल विभागास सदिच्छा भेट दिली. यावेळी भूगोल विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली.
- बी.ए.3 व बी.ए.बी.एड 4 मधील विद्यार्थ्यानी शिवाजी विद्यापीठातील वनस्पती विभागास येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वनस्पती प्रजातीचे निरीक्षण करून माहित जाणून घेतली.
- बी.ए.२ व बी.ए.बी.एड३ मधील विद्यार्थ्यानी विवेकानंद महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र विभागास भेट देऊन तेथील विविध खडक प्रकाराची माहिती जाणून घेतली.
- भूगोल विभागाचा माजी विध्यार्थी वैभव गाडे याची पोलिस निरीक्षक पदी निवड झाले बद्दल विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
- २६ डिसेंबर २०१९ रोजी विभागातील विद्यार्थ्याना खंडग्रास सूर्यग्रहण दाखवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित चष्मे पुरविण्यात आले होते. विद्याथ्यानी ग्रहणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
- शहाजी महाविद्यालय येथे अग्रणी महाविद्यालय योजने अतर्गत आयोजित “सुदूर संवेदन आणि उपग्रह प्रतिमा वाचन” या विषयावरील कार्यशाळे ०५ विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग होता.
- स.ब. खाडे महाविद्यालय,कोपर्डे येथे अग्रणी महाविद्यालय योजने अतर्गत आयोजित “कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचा अभ्यास” या विषयावरील कार्यशाळे ०५ विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग होता.
- विभागातील सर्व विद्यार्थ्याना भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली बाबत एकदिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. यावेमी महाविद्यालय परिसारातील विविध ठिकाणांचे अक्षवृतीय रेखावृतीय विस्तार ठिकाणाची उंची याबाबत माहित देण्यात आली.
- भूगोल विभागातील सर्व प्राध्यापकांनी विविध चर्चासत्रे, परिसंवाद व कार्यशाळांमध्ये सहभाग घेऊन आपले संशोधन पेपर सादर केले.
- बी.ए.3 व बी.ए.बी.एड 4 मधील विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल कोंकण व गोवा याठिकाणी आयोजित केली होती . यावेळी प्रतापगड, रायगड, महाबळेश्वर, रत्नागीरी, पावस, सिंधुदुर्ग, दक्षिण व उत्तर गोवा या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. व याठिकाणांचा अक्षवृतीय रेखावृतीय विस्तार, ठिकाणाची उंची याबाबत माहित संकलित करण्यात आली.
- विभागातील विद्यार्थ्यानी २०१९ मधील प्रमुख ठिकाणावरील पूर परिस्थिती दाखवणारी छायाचित्रे विभागास भेट दिली.
|